शेतातून ठिबक सिंचनचे पाईप-विजपंपाची चोरी, मुद्देमालासह आरोपीला अटक

शेतातून ठिबक सिंचनचे पाईप-विजपंपाची चोरी, मुद्देमालासह आरोपीला अटक

राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथिल घोरपडवाडी येथिल तिन शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबक सिंचनचे पाईप व विजपंपाची चोरी करणाऱ्या एका चोरास मुद्देमालासह पकडण्यात आहे. या चोरा कडून 30 पाईप व 22 हजार रुपये किमंतीचे विजपंप आरोपी कडून जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुञाकडून समजलेली माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मल्हारवाडी येथिल घोरपडवाडी शिवारात भोजराज भानुदास गाडे यांच्या शेतातुन 6 जुलै राञीच्या दरम्यान ठिबक सिंचनासाठी जोडलेले 30 पाईप अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.23 जुलै रोजी राञी अंशा बापूरावजी येळे,रेवन तुळशीराम हापसे,पोपट काशिनाथ थोरात यांच्या विहिरीतील विजपंप व पाणबुडी पंप अज्ञात चोरट्याने चोरून नेले.यासंदर्भात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीची खाञी करुन घेतली असता सोमनाथ यादव बर्डे (रा. केकताई वस्ती चिंचाळे) याने चोरी केल्याची खाञी झाल्यावर सोमनाथ बर्डे यास अटक करुन अधिक तपास केला असता. बर्डे याने चोरुन नेलेले पाईप बटाईने करीत असलेल्या शेतातून काढुन दिले.सहाय्यक फौजदार औटी यांनी 30 पाईप जप्त केले.अधिक तपास केला असता 22 हजार रुपये किमंतीचे विजपंप व पाणबुडीपंप आरोपी काढुन दिले.पाईप व विजपंप चोरी करणाऱ्या बर्डे याचे साथीदार फरार झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे,उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार औटी, तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, पोलीस नाईक प्रवीण बागुल, गणेश सानप, पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, नदीम शेख , अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;