‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे निधन, तरुण वयातच घेतला जगाचा निरोप

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे निधन, तरुण वयातच घेतला जगाचा निरोप

प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सेठ शाहने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी धमाका केलाय. मात्र, सध्या बॉलिवूड क्षेत्रातून एक अत्यंत हैराण करणारी आणि वाईट बातमी पुढे येताना दिसतंय. अभिनेत्री दिव्या सेठ यांची मुलगी मिहिका सेठ हिचे निधन झाले. मिहिका सेठ हिचे अत्यंत कमी वयात निधन झाल्याने आता सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. मिहिका सेठ हिचे निधन 5 ऑगस्ट 2024 रोजी झाले. दिव्या सेठ यांनी लेकीच्या निधनानंतर एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. लोक या पोस्टवर कमेंट करून श्रद्धाजंली वाहताना देखील दिसत आहेत.

दिव्या सेठ यांनी लिहिले की, अत्यंत दु:खाने सांगावे लागत आहे की, आमची लाडकी मिहिका आता आमच्यासोबत नाहीये. 5 ऑगस्ट 2024 रोजी तिने या जगाचा निरोप घेतला. दिव्या आणि तिचा पती सिद्धार्थ शाह यांनी एक नोट जारी केलीये. मिहिका ही बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याचे देखील सांगितले जाते. 

या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी म्हटले आहे की, आम्ही तुमच्या दु:खामध्ये सहभागी आहोत. एका लिहिले की, हे दु:ख किती मोठे असेल याची कल्पनाही करता येत नाही. मिहिका हिची प्रार्थना सभा 8 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलीये. मिहिका ही आजारी असल्याची चर्चा आहे तर काहीजण तिला ताप आल्याचे तिचे निधन झाल्याचे म्हणताना दिसत आहेत. 

दिव्या सेठ यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहून लोक हैराण झाले. दिव्या सेठने मोठा काळ गाजवला आहे. दिव्या सेठ सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही त्या दिसतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;