‘कुणीतरी येणार गं’वर थिरकले ‘अशी ही बनवाबनवी’चे कलाकार; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

‘कुणीतरी येणार गं’वर थिरकले ‘अशी ही बनवाबनवी’चे कलाकार; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव

मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात तुफान गाजलेला आणि आजही अनेकांचा लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. या चित्रपटाला तीन दशकं उलटून गेली आहेत, तरी आजही त्यातील गाणी, डायलॉग्स, भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहेत. इतका काळ होऊनही या चित्रपटाचा चाहतावर्ग तसूभरही कमी झाला नाही. यातल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता तब्बल 35 वर्षांनंतर या चित्रपटातील काही कलाकार एकाच मंचावर आले. यावेळी त्यांनी ‘कुणीतरी येणार गं’ या गाण्यावर पुन्हा एकदा ठेका धरला. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका कार्यक्रमानिमित्त अभिनेता सचिन पिळगांवकर, त्यांची पत्नी सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ आणि अश्विनी भावे हे चौघं एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘कुणीतरी येणार गं’ या गाण्यावर एकत्र डान्स केला. निवेदिता यांच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘डोहाळे पुरवा..’ या कडव्याने व्हिडीओची सुरुवात होते. तेव्हा सुप्रिया पिळगांवकर या सचिन यांच्याकडे हावभाव करून डान्सची सुरुवात करतात. त्यानंतर सचिन पिळगांवकर ‘कुणीतरी येणार गं’वर ठेका धरतात. त्यांच्यापाठोपाठ सुप्रिया, निवेदिता आणि अश्विनी यासुद्धा नाचू लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘ऑल टाइम फेव्हरेट मराठी चित्रपट. लक्ष्मीकांत बेर्डे सरांची आठवण येते’, असं एकाने लिहिलं. तर ‘असा चित्रपट पुन्हा होणे नाही’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा चित्रपट एकदा काय हजार वेळा पाहिला तरी मन भरत नाही’, असं एका युजरने लिहिलं आहे. ‘सुवर्णकाळ’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

‘लिंबूचं मटण’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?’, ’70 रुपये वारले’ असे या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. काही चित्रपट वारंवार पाहिले तरी त्यातली मजा कधीच कमी होत नाही, असाच काहीसा अनुभव ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट पाहताना येतो. म्हणूनच या कलाकारांना पुन्हा एकत्र पाहिल्यावर चाहत्यांना खूपच आनंद झाला. तो आनंद त्यांनी लाइक्स आणि कमेंट्सच्या रुपात व्यक्त केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;