सोशल मीडियावर रीलच्या वेडाने केली चोराची पोलखोल; तरुणाचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले!

सोशल मीडियावर रीलच्या वेडाने केली चोराची पोलखोल; तरुणाचा कारनामा पाहून पोलीसही चक्रावले!

मुंबई पोलिसांनी अशा एका चोराचा पर्दाफाश केला ज्याचा कारनामा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हा चोरटा मुंबईतून बाईक चोरायचा. मग त्या बाईकची रील बनवायचा. त्यानंतर ही रील तो यूट्युब आणि इन्स्टाग्रामवर शेअर करुन विक्री करायचा. अखेर या चोरट्याचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी गुजरातमधून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अनुराग सिंह असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

‘अशी’ केली चोराची पोलखोल

मुंबईतील रहिवासी असलेल्या यश कदम या तरुणाची यमाहा बाईक 17 जुलै रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी यशने नागपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. यादरम्यान यशचा मित्र हर्षिल चोरडिया याने यूट्युबवर एक रील पाहिली.

या रीलमधील बाईक आणि यशची बाईक सारखीच होती. फक्त एक नंबर मागे-पुढे केला होता. मग त्याने आपल्या गुजरातमधील मित्रांना संपर्क केला. यानंतर अनुरागशी संपर्क साधून 10 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स दिले.

मुंबई पोलिसांनी हर्षिलच्या मदतीने एक प्लान आखला. त्यानुसार मुंबई पोलीस पथकाने वलसाड गाठत अनुरागला अटक केली. पोलीस चौकशीत त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली. चोराची मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;