भाजपच्या बॅनरबाजीला शरद पवारांच्या पक्षाचे प्रत्युत्तर; फडणवीसांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त

भाजपच्या बॅनरबाजीला शरद पवारांच्या पक्षाचे प्रत्युत्तर; फडणवीसांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त

भाजपच्या युवा मोर्चाने नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देखमुख यांच्याविरोधात बॅनर लावले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपच्या या बॅनरबाजीला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तुमच्या पक्षातील नेत्याला तडीपार करण्यात आले होते, असे असताना तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांचे बॅनर का झळकवता असा संतप्त सवाल करत शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोसमोर तडीपार असे लिहिलेला बॅनर झळकावला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला.

भाजपाच्या बॅनरबाजीला शरद पवार यांच्या पक्षाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तुमच्या पक्षाच्या राजकीय नेता तडीपार होता आणि तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्याविरोधात बॅनरबाजी का करता, असा सवाल करत शरद पवार पक्षाच्या कार्यतर्त्यांनी अमित शाह यांच्याविरोधातील बॅनर झळकावले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपा युवा मोर्चाने नागपुरात वसुली बुद्धी असे बॅनर लावले होते. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गोंदिया येथील तहसील कार्यालयसमोर निषेध व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद असे म्हणत, हातात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावासमोर तडीपार असे लिहिलेले बॅनर झळकावण्यात आले. तसेच देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद म्हणत त्यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपमधील केंद्रीय मंत्री अमित शहा स्वतः तडीपार असताना ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांविरोधात बॅनरबाजी करतात, याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;