हृतिकच्या घटस्फोटाबाबत सुझानच्या भावाने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला “तो मला खूप..”

हृतिकच्या घटस्फोटाबाबत सुझानच्या भावाने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला “तो मला खूप..”

अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2014 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. सुझान ही अभिनेते फिरोज खान यांची मुलगी आणि अभिनेता झायेद खानची बहीण आहे. बहिणीला घटस्फोट दिल्यानंतर झायेदचं हृतिकसोबतचं नातं चांगलं नसेल, असं काहींना वाटू शकतं. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. ‘मैं हूँ ना’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या झायेद नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झायेदने सांगितलं की आजही तो हृतिकच्या संपर्कात आहे आणि कधी कोणत्या विषयावर सल्ला घ्यायची वेळ आली, तर तो बिनधास्तपणे त्याला फोन करतो.

“मला कधीही कोणत्याही विषयाबाबत संभ्रम असला तर मी आजही डुग्गूला (हृतिक रोशन) फोन करून त्याचं मत विचारून घेतो. तो खूप चांगला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे तुमच्यासोबत चांगलंच वागलं पाहिजे, याचं काही कारण नसतं, तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला वस्तुनिष्ठपणे गोष्टी उलगडून सांगू शकते. हृतिक माझ्यासाठी तशी व्यक्ती आहे. मला तो खरंच खूप आवडतो”, असं झायेद म्हणाला.

सुझानला घटस्फोट दिल्यानंतर तुमच्या नात्यावर कधी काही परिणाम झाला का, असा प्रश्न विचारला असता झायेद पुढे म्हणाला, “कधीच नाही. आमच्यात कधीच दुरावा आला नाही. किंबहुना त्यावेळी भावोजी आणि मेहुण्याने जे करायला पाहिजे होतं, ते सर्व आम्ही केलं होतं. त्या दोघांचं नातं असतानाही आणि नसतानाही आम्ही नेहमी सारखेच वागत होतो. कारण अखेर त्याची मुलं ही माझीसुद्धा मुलंच आहेत. ते माझ्यासमोर लहानाचे मोठे झाले आहेत. या अशा सगळ्या गोष्टींसाठी जो समजूतदारपणा लागतो, तो आमच्यात आहे. आयुष्यात यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. घटस्फोट घेणं हा त्यांचा निर्णय होता आणि जे घडायचं होतं, ते घडलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

सुझानला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर दुसरीकडे सुझानसुद्धा अभिनेता अर्सलान गोणीला डेट करतेय. या चौघांनाही अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. बर्थडे पार्ट्यांनाही हे चौघं एकत्र येतात. किंबहुना सबा आणि सुझान यांच्यातही खूप चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं. अशा वेळी कौटुंबिक गेट-टुगेदरबाबत विचारल्यावर झायेद म्हणाला, “आमचं कुटुंब हे प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम ‘मॉडर्न फॅमिली’सारखंच आहे. आम्ही जणू नव्या मॉडर्न फॅमिलीसारखंच आहोत. आमच्यात खूप वेडेपणा आहे. इथे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचा स्वीकार मनमोकळेपणाने करतो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला निश्चितच आम्हाला थोडा वेळ लागला. पण आता आम्ही सर्वजण एकत्र खुश आहोत. ही खूप सुंदर भावना आहे. आम्ही सर्वजण एकत्र पार्टी करतो, मजामस्ती करतो, नाचतो.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;