एक्स बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा, ‘ही’ मराठी अभिनेत्री चर्चेत

एक्स बॉयफ्रेंड सोबत साखरपुडा, ‘ही’ मराठी अभिनेत्री चर्चेत

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा असून तो लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून अभिनेत्री हेमाली इंगळे ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याआधीच या अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. हेमालीने नुकताच साखरपुडा केला असून तिने तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Heymal Ingley (@hemalingle)

अभिनेत्री हेमाली इंगळेने तिच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला तिने एक्स बॉयफ्रेंड असे कॅप्शनही दिले आहे. हेमालीने साखरपुड्यासाठी जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हेमाली आणि तिच्या नवऱ्याच्या फोटोवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. नव्या आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या कलाकारांमध्ये  श्रिया पिळगांवकर, रिंकु राजगुरु, रसिका वेंगुर्लेकर, चैत्राली गुप्ते यांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

‘नवरा माझा नवसाचा-2’ हा चित्रपट येत्या 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमली इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव या कलाकारांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;