मिर्झापूरमध्ये मुन्ना भैय्या परतणार? सीजन 3 प्रेक्षकांना न आवडल्याने निर्मात्यांचे पाऊल?

मिर्झापूरमध्ये मुन्ना भैय्या परतणार? सीजन 3 प्रेक्षकांना न आवडल्याने निर्मात्यांचे पाऊल?

काही महिन्यांपूर्वी मिर्झापूर वेबसीरीजचा तिसरा सीझन अ‍ॅमेझॉन प्राईमवर रीलीज झाला होता. दोन वर्षांपासून वाट बघणाऱ्या प्रेक्षकांचा ही सीरीज पाहून हिरमोड झाला होता. पण आता मिर्झापूरच्या तिसऱ्या सीजनचा बोनस एपिसोड येणार आहे. खुद्द गुड्डू पंडित म्हणजेच अली फैजलने याबाबत माहिती दिली आहे.

अ‍ॅमेझॉन प्राईमवर मिर्झापूर ही वेबसीरीज चांगलीच लोकप्रिय आहे. यंदा तिसरा सीजन रीलीज झाल्यावर प्रेक्षकांनी या सीरीजवर उड्या मारल्या. आणि प्राईम व्हिडीओवर सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसीरीज ठरली. असे असले तरी प्रेक्षकांनी या सीजनबद्दल नाराजी दर्शवली होती.

पंकज त्रिपाठी या सिरीजमधले मुख्य पात्र आहेत. पण या तिसऱ्या सीजनमध्ये त्रिपाठी फार कमी दिसल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. त्यात मुन्ना त्रिपाठी दुसऱ्या सीजनमध्ये मरतो. मुन्ना त्रिपाठी नसल्यानेही प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता. तिसऱ्या सीजन हा आधीच्या दोन सीजनच्या तुलनेत कंटळवाणा झाल्याने प्रेक्षकांनी सोशल मीडियावर रोष व्यक्त केला होता.

बोनस एपिसोड

आता अली फैजलने तिसऱ्या सीजनमधल्या एका बोनस एपिसोडची घोषणा केली आहे. तिसऱ्या सीजनमध्ये काही डिलीटेड सीनमधून हा बोनस बनवल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे गुड्डू पंडित म्हणतो त्या प्रमाणे त्याने मारलेले एक कॅरेक्टर सीरीजमध्ये परतणार आहे. दुसऱ्या सीजनच्या शेवटी गुड्डू पंडित मुन्ना त्रिपाठीला मारून आपला बदला पूर्ण करतो. तर तिसऱ्या सीजनमध्ये गुड्डू पंडित रॉबिनला मारतो. आता सीरीजमध्ये मुन्ना त्रिपाठी परत येणार का अशी चर्चा सुरू आहे. पण मुन्ना त्रिपाठीवर अंत्यसंस्कारावरूनच तिसरा सीजन सुरू होतो. त्यामुळे तो परत कसा येणार अशी चर्चा सुरू आहे. तसेच तीसरा सीजन प्रेक्षकांना न आवडल्याने निर्मात्यांनी हा निर्णय घेतला का असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. या महिन्यात हा बोनस एपिसोड रीलीज होणार आहे. हा एपिसोड रीलीज झाल्यानंतरच या रहस्यावरून पडदा उठणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;