मध्य रेल्वेवर डोंबिवलीजवळ तांत्रिक बिघाड का झाला? कारण आले समोर
सोमवारी मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकसेवा विस्कळीत झाली होती. सामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. पण हा तांत्रिक बिघाड का झाला याचे कारण समोर आले आहे. ठाकूर्ली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर पक्षी धडकल्याने शॉर्टसर्किट झाल्याचे कारण समोर आले आहे.
मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार दुपारी दोन वाजून 28 मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजल्यापासून 8 मिनिटांपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या वेळेत लोकलच्या 20 फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
ठाकूर्ली रेल्वे स्थानकाजवळ काही पक्षी ओव्हरहेड वायरवर धडकले, त्यामुळे शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ठाकूर्ली स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा शॉर्टसर्किट झाला. तेव्हा गाडी थांबली आणि प्रवाशांनी घाबरून लोकलमधून उड्या मारल्या. त्यानंतर मध्य रेल्वेवरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दादर, कुर्ला, ठाणे स्थानकांवर प्रवाशांची चांगलीच गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी चेंगरा चेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List