आज स्वत:साठी उभा रहा..; ‘बिग बॉस मराठी 5’च्या सदस्यासाठी विशाखा सुभेदारची पोस्ट

आज स्वत:साठी उभा रहा..; ‘बिग बॉस मराठी 5’च्या सदस्यासाठी विशाखा सुभेदारची पोस्ट

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. अगदीच पहिल्याच एपिसोडपासून या शोने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धक सहभागी झाले असून प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. अशातच सोशल मीडियाद्वारे काहींना चांगला पाठिंबा मिळतोय. अभिनेत्री विशाखा सुभेदारने ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातील एका सदस्यासाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून तिने त्या सदस्याला मोलाचा सल्लासुद्धा दिला आहे. विशाखाने तिची ही पोस्ट पंढरीनाथ कांबळेसाठी लिहिली आहे. ‘मैत्री दिना’चं औचित्य साधत आधी तिने त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर त्याच्यासाठी खास संदेश लिहिला आहे.

विशाखा सुभेदारची पोस्ट-

‘हॅपी फ्रेंडशिप डे मित्रा.. तू तिथे त्यांच्यासारखा नसलास तरीही तू खूप खास आहेत, वेगळा आहेस, सज्जन आहेस. तारेवरची कसरत तुला कायमच जमलीय. तिथेही तू मैत्री कर आणि ती निभव.. तुझ्यातली प्लस पॉईंट्स दाखवून दे. गप्प बसू नकोस. यारों का यार हैं तू, तुझ्या माणसासाठी तू उभा असतोस मदतीला, आज स्वत:साठी उभा रहा मित्रा. तुला खूप बळ मिळो पॅडी कांबळे’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. विशाखाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी विशाखाला बिग बॉसच्या घरात पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तर काहींनी पंढरीनाथ कांबळेच विजेता ठरणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज एक नवीन वाद पहायला मिळतोय. पहिल्या दिवसापासून शांत असलेल्या सूरजचं जान्हवीसोबत कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर घरात दोन गट पडले आहेत. एकीकडे सूरज आणि जान्हवीचं भांडण पहायला मिळालं. तर दुसरीकडे पंढरीनाथ आणि घन:श्याम दराडे यांच्यातदेखील वादाची ठिणगी पडलेली पहायला मिळाली. पंढरीनाथ घन:श्यामला बोलतो, “तुला लाज नाही का वाटत? बिग बॉस आपल्याविरोधात बोलत आहे.” त्यावर घन:श्यामदेखील त्याला प्रत्युत्तर देतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;