साताऱ्यात माध्यमिक शिक्षक, कर्मचाऱ्याचा आज संप

साताऱ्यात माध्यमिक शिक्षक, कर्मचाऱ्याचा आज संप

माध्यमिक शिक्षक क शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न शालेय शिक्षण किभागाकडे प्रलंबित आहेत. या प्रश्नांबाबत अनेकदा निवेदने दिली, प्रत्यक्ष भेटून चर्चाही केली. मात्र, सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षण क्षेत्रातील 28 संघटनांनी मंगळवारी (दि. 6) एकदिवसीय संप पुकारला आहे.

यादिकशी शाळा, कॉलेज बंद ठेवून सर्व संघटनांच्या सातारा जिल्हा शैक्षणिक व्सासपीठामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराक फाळके, कार्याध्यक्ष सचिन नलवडे, सचिन भरत जगताप यांनी दिली.

शालेय शिक्षण किभागाकडे शासनस्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित असून, शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक आमदार यांनी अनेक वेळा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. या प्रश्नांबाबत अनेकदा विधान परिषद सभागृहात चर्चा झाली. मात्र, धोरणात्मक प्रश्नांवर अद्यापि निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक क उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने संस्थाचालक संघटना, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ, शिक्षकेतर संघटना, ग्रंथपाल संघटना, विविध शिक्षक संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील 28 संघटनांनी एकत्र येत मंगळकारी (दि. 6) राज्यभर संप पुकारला आहे.

सातारा जिल्ह्यात सर्व संघटनांच्या सातारा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठामार्फत मंगळवारी राजवाडा, राजपथ, पोकईनाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना देण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;