Mahesh Bhatt: ‘मी एकटी राहत होती तेव्हा…’, महेश भट्ट सोबत अफेअर? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मोठं सत्य समोर

Mahesh Bhatt: ‘मी एकटी राहत होती तेव्हा…’, महेश भट्ट सोबत अफेअर? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून मोठं सत्य समोर

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट्ट कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. महेश भट्ट यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. शिवाय खुद्द महेश भट्ट यांनी देखील स्वतःच्या प्रेमप्रकरणांवर मोठं वक्तव्य केलं आहे. आता देखील महेश भट्ट यांच्या खाजगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, ‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनू अग्रवाल आहे.

आशिकी गर्ल अनू अग्रवाल ही महेश भट्ट यांची फार खास होती. एका मुलाखतीत अनू सांगितलं होतं की, ती सर्व सीन एका टेकमध्ये पूर्ण करते. त्यामुळे महेश भट्ट अभिनेत्रीला ‘वन टेक गर्ल’ म्हणू लागले होते. महेश भट्ट सतत अनू हिचं कौतुक करायचे, त्यामुळे इतरांमध्ये दोघांविषयी अनेक चर्चा रंगायच्या. महेश भट्ट आणि अनू यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

महेश भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्यानंतर खुद्द अभिनेत्रीने यावर मौन सोडलं होतं, ‘माझ्या आणि महेश यांच्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या होत्या. ते सतत माझं कौतुक करत असल्यामुळे लोकं आमच्या नात्यावर प्रशचिन्ह उपस्थित करु लागली होती. पण मी लोकं काय म्हणतात याकडे कधीच लक्ष दिलं नाही. मी तरुन मुलगी होती, जी एकटीच राहयची. वयाच्या 22 वर्षापासून मी स्वतःला संभाळत आहे…’

सर्वांसमोर प्यायची सिगारेट…

स्वतःबद्दल अनू अग्रवाल म्हणाली, ‘मी उंच आणि सावळी असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला…’ अनू तेव्हा बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. अनू कधीच इतर अभिनेत्रींप्रमाणे लाजली नाही. ती कायम मुलांसमोर देखील सिगारेट प्यायची. तेव्हा अनू अग्रवाल तुफान चर्चेत होती.

अनू म्हणाली, ‘मझ्यामध्ये प्रचंड अहंकार होता. मी कधीच इतर मुलींप्रमाणे लाजली नाही… मी समोरच्याच्या डोळ्यात बघून बोलायची… सिगारेट प्यायची असेल तर मी सर्वांसमोर प्यायची… मी सेटवर देखील माझ्या सिगारेटचा पाकिट घेऊन जायची…’ असं देखील अनू अग्रवाल मुलाखतीत म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;