‘तुला कानाखाली हवी का..’; अक्षय कुमार कतरिनाला असं का म्हणाला? सर्वांनाच बसला धक्का!

‘तुला कानाखाली हवी का..’; अक्षय कुमार कतरिनाला असं का म्हणाला? सर्वांनाच बसला धक्का!

अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. कतरिना आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. या केमिस्ट्रीमुळेच त्यांचे चित्रपट हिट ठरले. किंबहुना ऑफस्क्रीनसुद्धा या दोघांमध्ये चांगली मैत्री पहायला मिळते. विविध कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये हे दोघं एकमेकांची थट्टामस्करी करताना दिसतात. पण एकदा कतरिनाने अक्षयसमोर अशी जिद्द केली होती, ज्यामुळे अक्षयची जीभ घसरली. तो तिला असं काही बोलून गेला, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अक्षय आणि कतरिना यांनी ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दिवाना कर गए’, ‘सूर्यवंशम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

कतरिनाने निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने ‘तीस मार खाँ’ या चित्रपटातील ‘शीला की जवानी’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. या शूटिंगदरम्यान कतरिनाला अक्षयच्या हातावर राखी बांधायची होती. मात्र अक्षयने तिला साफ नकार दिला होता. याविषयी तिने सांगितलं, “मला अक्षयला राखी बांधायची होती. मी त्याचा खूप आदर करते आणि त्याला खूप मानते. त्यामुळे त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही. मी त्याला विचारलं की, मी तुला राखी बांधू शकते का? त्यावर अक्षय मला म्हणाला, कतरिना, काय? तुला कानाखाली हवंय का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

याच मुलाखतीत कतरिनाने अर्जुन कपूरसोबतचा मजेशीर किस्सा सांगितला. “अक्षयने मला नकार दिल्यानंतर मी खूप नाराज झाले होते. मी एका पार्टीला गेली होती आणि तेव्हाच माझ्यासमोर अर्जुन कपूर आला होता. त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मी अखेर त्याला राखी बांधायचं ठरवलं होतं. मी फक्त अर्जुनला इतकंच म्हटलं की, अर्जुन तू माझा मानलेला भाऊ बनशील का? मी तुला राखी बांधू शकते का? हे ऐकताच तो तिथून बाहेर पळाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो माझ्यासमोर आला, तेव्हासुद्धा त्याने पळ काढला होता.”

कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी अभिनेता विकी कौशलशी लग्नगाठ बांधली. राजस्थानमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. विकी कौशलशी लग्न करण्यापूर्वी कतरिनाचं नाव अभिनेता सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्याशी जोडलं गेलं होतं. तर कतरिनाशी लग्न करण्यापूर्वी विकी हा अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;