गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षे सरसकट परवानगी द्या; समन्वय समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षे सरसकट परवानगी द्या; समन्वय समितीची पालकमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या दहा वर्षांत गणेशोत्सव साजरा करताना नियम-अटी पाळल्या आहेत, त्यांना सलग आणि सरसकट पाच वर्षे परवानगी द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. याबाबत पालिकेने कोणत्याही अटी घालू नयेत अशी मागणीही मंडळांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन समन्वय समितीच्या मागणीबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

नियम व अटी पाळणार्‍या मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी देण्याची घोषणा पालिकेने केली असली तरी पोलीस आणि वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी व स्वयंघोषित अ‍ॅफेडेव्हिट द्यावे, आदी अटी घातल्या आहेत. याबाबत पालकमंत्री आणि समन्वय समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या भाड्यात 50 टक्के सवलत, नि:शुल्क अग्निशमन सेवा मिळणार आहे. तर मंडळांना आता मुंबईतील दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षे झालेल्या मंडळांचे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे कार्यालय यांना मालमत्ता करात 50 टक्के सवलत द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;