श्रद्धा कपूर हिच्या आयुष्यात मोठे वादळ, अनेक वर्षांनंतर अखेर…

श्रद्धा कपूर हिच्या आयुष्यात मोठे वादळ, अनेक वर्षांनंतर अखेर…

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. श्रद्धा कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. श्रद्धा कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. श्रद्धा कपूर सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशनही श्रद्धा कपूर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून करते. यावेळी श्रद्धा कपूर ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

श्रद्धा कपूर ही गेल्या काही वर्षांपासून राहुल मोदी याला डेट करत आहे. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर हे लवकरच लग्न करणार आहेत. नेहमीच दोघे एकत्र स्पॉट होताना देखील दिसतात. श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी हे लहानपणीपासूनचे मित्र असल्याचेही सांगितले जाते.

आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, नेमके कोणत्या कारणामुळे यांचे ब्रेकअप झाले हे कळू शकले नाहीये. श्रद्धा कपूर किंवा राहुल मोदी यांनी त्यांच्या नात्याबद्दल काहीच भाष्य केले नाहीये. श्रद्धा कपूर हिने राहुल मोदी याला सोशल मीडियावरून अनफॉलो केले आहे.

इंस्टाग्रामवर श्रद्धा कपूर ही राहुल मोदी याला आता फॉलो करत नाहीये. श्रद्धा कपूरच्या लिस्टमधून राहुल मोदी याचे नाव गायब झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर श्रद्धा कपूर हिने फक्त राहुल मोदी यालाच नाही तर त्याची बहिण आणि त्याच्या संबंधित इतरही काही लोकांना अनफॉलो केले आहे.

श्रद्धा कपूर हिने जरी राहुल मोदी याला अनफॉलो केले असले तरीही राहुल मोदी याने अजूनही श्रद्धा कपूर हिला अनफॉलो केले नाहीये. तो श्रद्धा कपूरला फॉलोच करताना दिसतोय. आता हे स्पष्ट होतंय की, श्रद्धा कपूर हिच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;