अमृता खानविलकरचं स्वप्न पूर्ण…; नव्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता खानविलकरचं स्वप्न पूर्ण…; नव्या माध्यमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनय आणि नृत्य यातून कायम प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ या नृत्य संगीतात तिच्या भव्य नाट्यपदार्पणासह एक नवीन प्रवास सुरू केला आहे. थेट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याचे तिचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण या निमित्ताने पूर्ण होतंय. अमृताच्या आगामी ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ मधून शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल यातून अनुभवयाला मिळणार आहे. याचा टीझर अमृताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यातून या नृत्य संगीतनाट्याच्या माध्यमातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमृताची स्वप्नपूर्ती

‘वर्ल्ड ऑफ स्त्री’मध्ये अमृता सोबत डान्स गुरु आशिष पाटील आणि 10 अफलातून नर्तकांची प्रतिभावान टीम आहे. 90 मिनिटांचा लाइव्ह ऑडिओ-व्हिज्युअल परफॉर्मन्स भक्ती (भक्ती), सौंदर्य (श्रृंगार) आणि डायनॅमिक एनर्जी (शिवशक्ती) च्या थीम्स नुसार असणार असून तो नक्कीच मंत्रमुग्ध करणारा असणार आहे. अमृता एक अभिनेत्री म्हणून सगळ्यांना माहीत आहे पण तिच्या नृत्य अविष्कराची अनोखी बाजू वर्ल्ड ऑफ स्त्री मधून अनुभवयाला मिळणार आहे.

अमृताने याआधी एक कमालीचं पोस्टर तिच्या सोशल मीडिया वरून शेयर केलं होत आणि आता अमृताने ‘वर्ल्ड ऑफ स्त्री ‘चा टीझर लाँच केला आहे. तिने या टीझरमधून या कार्यक्रमाची एक सुंदर झलक प्रेक्षकांना दिली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी या कार्यक्रमासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता काय म्हणाली?

नृत्य हा कायमचं माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वर्ल्ड ऑफ स्त्री च्या निमित्तानं नाट्य, नृत्य आणि संगीत यांची अनोखी सांगड घालून ही एक मैफिल प्रेक्षकांना देणं हे माझ्यासाठी स्वप्न होत आणि ते पूर्ण होतंय… आशिष पाटील अर्थ एनजीओ यांच्यासोबत सहकार्य करून आणि कथ्थक नर्तकांची एक अत्यंत कुशल टीम सोबत घेऊन हा नवा प्रवास सुरू करणं माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, असं अमृता या तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल म्हणाली.

मी कायम प्रेक्षकांना काय हवंय हे देण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत आणि नृत्य कार्यक्रमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे वर्ल्ड ऑफ स्त्री रंगमंचावर घेऊन येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कमालीचे व्हिज्युअल, भावपूर्ण संगीत आणि मनमोहक नृत्य सादरीकरणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि त्यांना मंत्रमुग्ध करणे हेच आमचं ध्येय आहे, असंही अमृता खानविलकर म्हणाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;