नगरमधील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

नगरमधील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

नगरमधील व्यापार्‍याकडून खरेदी केलेल्या कांद्याचे 43 लाख 99 हजार 754 रूपये न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 41, रा. संदीपनगर, सारसनगर) असे फसवणूक झालेल्या कांदा व्यापार्‍याचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहम्मद कदिर ऊर्फ चिन्नु सेठ, नुर मोहम्मद, मोहम्मद रिहान (सर्व रा. लखनऊ, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा परप्रांतीय व्यापार्‍यांची नावे आहेत.

चिपाडे यांचा येथील मार्केटयार्डमध्ये कांदा आडतदाराचा व्यवसाय आहे. त्यांची नुर मो. कदिर अँड कंपनीच्या वरील तिघांसोबत ओळख झाली होती. ते तिघे चिपाडे यांच्याकडे आले होते. चिपाडे व त्यांच्यात कांदा खरेदी विषयी बोलणे झाले होते. त्यानुसार चिपाडे यांनी त्यांना कांदा पाठविण्यास सुरूवात केली. 11 जानेवारी 2022 पासून सात ते आठ महिने पाठविलेल्या कांद्याचे पैसे देखील चिपाडे यांना मिळाले होते. दरम्यान, त्यानंतर चिपाडे यांनी पाठविल्या दोन कोटी 39 लाख दोन हजार 574 रूपये कांद्याच्या रक्कमेपैकी एक कोटी 95 लाख दोन हजार 820 रूपये त्या तिघांनी चिपाडे यांना दिले होते. उर्वरित 43 लाख 99 हजार 754 रूपये दिले नाही. वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. पैसे मागितले असता चिपाडे यांना शिवीगाळ करून संपवुन टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;