Paris Olympic: हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाची ऐतिहासिक कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत धडक
Paris Olympic 2024 मध्ये हिंदुस्थानने आतापर्यंत तीन कांस्य पदकं कमावली असून ही पदकं आपल्याला नेमबाजीत मिळाली आहे. आता आणखी एक आनंदाची बातमी ऑलिम्पिक नगरीतून आली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचा महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कारण प्रथमच महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
राऊंड ऑफ 16 स्पर्धेत हिंदुस्थानने रोमानियाचा 3-2 असा पराभव केला. हिंदुस्थानने पहिले दोन सामने जिंकले आणि पुढचे दोन गमावले. त्यानंतर मनिका बत्राने निर्णायक सामना जिंकला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List