मध्य रेल्वे विस्कळीत; डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, स्फोटासारखा आवाज झाल्यानं प्रवाशांची पळापळ
डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक लोकल एकामागोमाग एक थांबल्या असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी लोकल धावत असतानाच डोंबिवलीजवळ ओव्हरहेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला. त्यामुळे लोकल जागीच थांबली. यामुळे प्रवाशांनी प्रचंड पळापळ सुरू झाली. प्रवाशांनी लोकलमधून बाहेर उड्या घेतल्या आणि वाट दिसेल तिकडे धाव घेतली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List