फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थाच आजारी; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थाच आजारी; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंत लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले. गर्भवती महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोहोचली; पण प्रसूतीनंतर बाळ दगावले. या घटनेमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बिमार झाली आहे. एकीकडे ‘लाडकी बहिण‘ योजनेच्या प्रचार प्रसाराकरीता 270 कोटी रुपये खर्च होत असताना अश्या घटना पुढे येत असल्याने राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कुठे मुलाला आपल्या वडिलांना घेऊन जावे लागते तर कुठे गरोदर महिलेला कावड करून रुग्णालयात न्यावे लागत आहे. एका मागून एक अशा घटना घडत आहे, पण या सरकारला आणि प्रशासनाला पाझर काही फुटत नाही. फक्त टक्केवारीमध्ये पुढे पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. बिमार आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;