‘भांडी घासण्याच्या ट्रॉमा’वरून ट्रोल करणाऱ्यांना ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या बहिणींनी सुनावलं

‘भांडी घासण्याच्या ट्रॉमा’वरून ट्रोल करणाऱ्यांना ‘कोकण हार्टेड गर्ल’च्या बहिणींनी सुनावलं

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु झाला आहे. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात बराच ड्रामा पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता प्रभू वालावलकरदेखील बिग बॉसच्या घरात आहे. अंकिता वालावलकर हिचा एक व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती ‘भांडी घासण्याच्या ट्रॉमा’वर बोलताना दिसतेय. आर्या जाधवशी बोलताना ‘भांडी घासण्याच्या ट्रॉमा’ असल्याचं सांगते. तिचा हा व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अंकिता वालावलकरला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर तिच्यावर मिम्स बनत आहेत.

‘कोकण हार्टेड गर्ल’ ट्रोल

मला भांडी घासायचा ट्रॉमा आहे. तरिही मी ते करत आहे. माझ्या घरच्यांना पण माहिती आहे, असं अंकिता म्हणते. त्यावर मी भांडी घासते, असं आर्या तिला म्हणते. पण त्यावर नाही मला भांडी घासायचीच आहेत. कारण मला माझ्यातील विक पॉइंटवर काम करायचं आहे, असं अंकिता तिला सांगते. जिथं भांडणं दिसतात. तिथून बाजूला व्हायचं. विनाकारण भांडायचं नाही. वाद होतील, असं दिसलं तर तिथून बाजूला व्हायचं, असं अंकिता आर्याला सांगते. तिचा हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत अंकिताला ट्रोल केलं आहे. तिच्या या व्हीडिओवर अनेकांनी मिम्स देखील बनवले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बहिणींकडून व्हीडिओ शेअर करत उत्तर

अंकिता वालावलकर हिला ट्रोल केल्यानंतर तिच्या बहिणींनी एक व्हीडिओ शेअर केलाय. त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. ट्रॉमा म्हणजे मनाला झालेली जखम… मी पण जर एक सामान्य व्यक्ती असते तर मी देखील अशीच कमेंट केली असती. पण कधी-कधी आपल्याला सामान्य वाटणारी गोष्ट समोरच्यासाठी किती कठीण असू शकते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण या गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणं योग्य नाही, असं अंकिताच्या लहान बहिणीने म्हटलं आहे.

आपल्यातली माणुसकी किती लयाला गेली आहे का? की एखाद्याचा ट्रॉमा आपल्यासाठी हसण्याचं साधन बनावं… मिम मटेरियल बनावं?, असंही अंकिताच्या बहिणीने म्हटलं आहे. सोशल मिडियावरच्या 2 मिनिटांच्या क्लिपवरून आपण एखाद्या व्यक्तीचं अख्खं आयुष्य क्षणात जज करतो. पण कधी- कधी आपल्याला क्षुल्लक वाटणारी गोष्ट एखाद्याला आयुष्यभराची जखम देणारी असू शकते हे आपण सपशेल विसरतो. बाकी प्रेक्षकाक काळजी…, अशी पोस्ट अंकिताच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;