परमवीर सिंह आणि फडणवीसांमध्ये डील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

परमवीर सिंह आणि फडणवीसांमध्ये डील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. तसेच परमवीर सिंह आणि फडणवीस यांच्या डील झालं होतं असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. चांदीवाल अहवाल महायुती सरकारने का जाहीर केला नाही असा सवाल देशमुख यांनी विचारला होता. तेव्हा हा अहवाल महाविकास आघाडीचे सरकार असताना सादर झाला होता असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण तो अहवाल जाहीर होण्यापूर्वी 40 आमदारांना 50 कोटी रुपये देऊन फडणवीसांनी सरकार पाडलं असा आरोप देशमुखांनी केला.

परमवीर सिंह प्रकरणी देशमुख म्हणाले की मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा परमवीर सिंह पोलिस आयुक्त होते आणि फडणवीस विरोधी पक्षनेते होते असा दावा फडणवीसांनाी केला होता. मी परमवीर सिंहाना देशमुखांवर आरोप करा असे मी कसे काय सांगू शकतो असे फडणवीस म्हणाले होते. पण मी गृहमंत्री होतो तेव्हा मुकेश अंबानींच्या घरासमोर एका स्कॉर्पियोमध्ये स्फोटकं ठेवली होती. नंतर त्या गाडी मालकाची हत्या झाली होती. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंह हे मास्टरमाईंड होते. सिंह यांना एनआयएकडून अटक होणर होती. तेव्हा परमवीर सिंह आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. परमवीर सिंह फडणवीसांना शरण गेले आणि या गुन्ह्यात मला अटक करू नका अशी विनंती केली. तेव्हा आमचं सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी सिंह यांना माझ्यावर आरोप करायला सांगितलं. फडणवीस आणि सिंह यांच्यात अशी डील झाली होती, त्यामुळेच सिंह यांनी माझ्यावर आरोप लावले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;