‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’; महेश कोठारेंची नवी पौराणिक मालिका

‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’; महेश कोठारेंची नवी पौराणिक मालिका

‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’च्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर नवी पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ‘कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला. याप्रसंगी महेश कोठारे म्हणाले, “स्टार प्रवाह वाहिनीसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर ‘विठुमाऊली’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘पिंकीचा विजय असो’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा सुपरहिट मालिका केल्या. ‘उदे गं अबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे.”

पहा प्रोमो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

“ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही. या भव्यदिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल. या नव्या प्रोजेक्टसाठी प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच्छा व्यक्त करेन,” असं ते पुढे म्हणाले. या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘बऱ्याच दिवसांनंतर स्टार प्रवाहवर देवीची मालिका पहायला मिळणार’, असं एकाने लिहिलंय. तर ‘या मालिकेविषयी बरीच उत्सुकता आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. प्रोमो पाहून अनेकांनी ही मालिका बघण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;