बदलापुरात केमिकल कंपनीत स्फोट, रहिवाशी चाळीत रिअ‍ॅक्टर पडल्याने चिमुकलीसह तीनजण जखमी

बदलापुरात केमिकल कंपनीत स्फोट, रहिवाशी चाळीत रिअ‍ॅक्टर पडल्याने चिमुकलीसह तीनजण जखमी

बदलापूरमध्ये एका केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा रिअ‍ॅक्टर जवळच्या चाळीत येऊन पडला. त्यात एका चिमुकलीसह तीन जण जखमी झाले आहेत.

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की रिअ‍ॅक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही.

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं. आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कंपनीत रिअ‍ॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली. हा स्फोट इतका भीषण होता की रिअ‍ॅक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय, तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;