नाना शंकरशेट यांचे चरित्र अभ्यासक्रमात

नाना शंकरशेट यांचे चरित्र अभ्यासक्रमात

मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या चरित्राची निवड करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी माहिती दिली.

डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाला शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱया एल्फिन्स्टन, सिडनहॅम, सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज आणि द इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या महाविद्यालयांचे हे एकत्रित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ असून या विद्यापीठाची स्थापना 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक, जडणघडणीमध्ये या ऐतिहासिक वारसा असणाऱया या महाविद्यालयांचे योगदान मोलाचे आहे.

या महाविद्यालयामधून नाना शंकरशेट यांचे चरित्र विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. ग्रंथाच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव विलास पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, रवींद्र बेडकीहाळ, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास धुरे, प्रा. सुविधा सरवणकर, प्रा. वंदना कांबळे, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, अॅड. मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर, प्रा. बाळासाहेब खोमणे, रामेश्वर रोकडे यांनी शेंडे यांचे अभिनंदन केले.

अमर शेंडे हे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्यवाह असून गेली वीस वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा या पुस्तकाची हैदराबाद येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय, कोलकाता व महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झाली होती. अमर शेंडे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानानेही गौरविण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;