आरोग्य केंद्राचे संरक्षण खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती, राज्यात 1906 जणांची होणार नेमणूक

आरोग्य केंद्राचे संरक्षण खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती, राज्यात 1906 जणांची होणार नेमणूक

ग्रामीण भागात गावोगावी, खेडोपाडी कार्यरत असणाऱया आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियंत्रणातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुरक्षा आता खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती सोपवण्यात येणार आहे. राज्यातील 1 हजार 906 प्राथमिक आरोग्य केंद्रांत बाह्ययंत्रणेद्वारे खासगी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. यात नगर जिह्यातील 100 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश राहणार आहे. या बाह्ययंत्रणेतील सुरक्षारक्षकांची नेमणूक ही सरकार पातळीवरून होणार असून, त्यानंतर याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला माहिती देण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत तीनवेळा शासननिर्णय काढले आहेत. आधीच्या दोन शासननिर्णयांत करण्यात आलेल्या तरतुदी 1 ऑगस्टला काढण्यात आलेल्या शासननिर्णयात रद्द करण्यात आल्या आहेत. आता राज्यपातळीवरून एकत्रित सर्व 1 हजार 906 प्राथमिक आरोग्य केंद्रांत बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाने काढलेल्या पहिल्या शासननिर्णयात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षारक्षक नेमण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर राज्यातील 34 पैकी नाशिक, रायगड, कोल्हापूर, जळगाव आणि नंदूरबार हे पाच जिल्हे वगळून अन्य ठिकाणी राज्यपातळीवरून बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा हा आदेश रद्द करत राज्यातील सर्व जिह्यांत एकाचवेळी सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या जिह्यात हे सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत, त्याचीच माहिती त्या-त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला आधी मिळणार नाही. नेमणूक झाल्यानंतर संबंधित खासगी सुरक्षारक्षक यांची नेमणूक झाल्याची माहिती देण्यात येणार आहे.

सैनिक मंडळाला प्राधान्य

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक टोकाचे प्रकार घडत आहेत. यासह या ठिकाणी वाढत्या चोऱया रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने घेतले आहेत. यासाठी राज्यपातळीवरून सेवानिवृत्त सैनिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या सैनिकांच्या मंडळानुसार प्राधान्यक्रमाने संबंधित खासगी सुरक्षारक्षक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात येणार आहे.

आठ तास डय़ुटी; 16 हजार पगार

प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात येणाऱया खासगी सुरक्षारक्षकांना महिन्याला 16 हजार रुपये पगार देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित सुरक्षारक्षकाला आठ तास डय़ुटी करावी लागणार आहे. तसेच तीन शिफ्टमध्ये हे सुरक्षारक्षक काम करणार असल्याचे आरोग्य विभागाच्या शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;