Share market crash : शेअर बाजार धडाम; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांकात 1500 अंकांची घसरण

Share market crash : शेअर बाजार धडाम; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांकात 1500 अंकांची घसरण

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार धडाम झाला आहे. सोमवारी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) 1500 हून अधिक, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 450 अंकांनी पडला. अचानक झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकादारांच्या लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. बातमी लिहीपर्यंत सेन्सेक्स 1530 अंकांनी घसरला होता, तर निफ्टी 470 अंकांनी घसरला होता. विक्रीचा सपाटा सुरू झाल्यास बाजारात आणखी पडझड पहायला मिळण्याची शक्यता आहे.

निफ्टी फिफ्टीमधील टाटा मोटर्स हा शेअर सर्वाधिक 4.33 अंकांनी पडला. त्यासह हिंडाल्को 4.04 टक्के, ओएनजीसी 3.88 टक्के, श्रीराम फायनान्स 3.47 टक्के आणि जेएसडब्ल्यू स्टील 3.27 टक्क्यांनी पडला. या सर्व पडझडीमध्येही ब्रिटानियाचा शेअर 2.18 टक्के, सन फार्मा 1.30 टक्के आणि हिंदुस्थानी युनीलिव्हर 1.17 टक्क्यांनी वधारला.

एएसईने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, आज जवळपास 35 शेअरला अप्पर सर्किट लागले असून तब्बल 198 शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेलाल झाले आहेत. फ्यचर अँड ऑप्शनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि शॉर्ट टर्मसाठी शेअर घेतलेल्या अनेक गुंतवणूकदारांना या घसरणीचा फटका बसला आहे.

अमेरिकेमध्ये मंदिची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे इस्रायल आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण आहे. यामुळे जागतिक बाजारातही ‘ब्लड बाथ’ पहायला मिळाला. याचाच परिणाम हिंदुस्थानच्या मार्केटमध्येही झाला आणि बाजार उघडताच विक्रीचा सपाटा सुरू झाला. यामुळे बाजार कोसळला.

दरम्यान, याआधी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही बाजार कोसळला होता. सेन्सेक्समध्ये 885.59 अंकांची घसरण होऊन तो 80981.95 वर बंद झाला, तर निफ्टी 293.20 अंकानी घसरून 24717.70 वर पोहोचला होता. घसरणीचा हा सिलसिला सोमवारीही पहायला मिळाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;