शिक्षणमहर्षी प. म. राऊत यांचे निधन

शिक्षणमहर्षी प. म. राऊत यांचे निधन

विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक प. म. राऊत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प. म. राऊत यांनी प्राथमिक शाळेतून ज्ञानदानाचे काम सुरू करून 1962 साली पंतनगर, घाटकोपर येथे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. विक्रोळी, घाटकोपर, वांगणी व रेडी तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांनी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय सुरू करून या संस्थेचा वटवृक्ष वाढवला.

आज सुमारे दहा हजार विद्यार्थी या संस्थेंतर्गंत शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. हिंदुस्थान सरकारने 1994 साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून विकास रात्रशाळा व ज्युनियर कॉलेज व विकास रात्र महाविद्यालय सुरू केले.

शिक्षक व शैक्षणिक संस्थांच्या विविध समस्या, वेतन, वेतनेतर अनुदान, शिक्षक संचमान्यता, कायम विनानुदानित शाळांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा फी प्रश्न या व अशा विविध समस्या संघटना पातळीवर सरकारकडे मांडण्यासाठी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांनी विशेष कार्य केले. भंडारी समाज मंडळ, मुंबई या सामाजिक संस्थेचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;