ठाणे जिल्हा ग्राहक मंचाला अद्याप जागा का दिली नाही? हायकोर्टाचे मिंधे सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश

ठाणे जिल्हा ग्राहक मंचाला अद्याप जागा का दिली नाही? हायकोर्टाचे मिंधे सरकारला उत्तर सादर करण्याचे आदेश

ठाणे जिल्हा ग्राहक मंचाला हक्काची जागा देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल उच्च न्यायालयाने मिंधे सरकारला केला. याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे आदेश सरकारला देत न्यायालयाने पुढील सुनावणी 4 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

अमृता भंगारे यांनी अॅड. सुमित काटे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ग्राहक मंचाला हक्काची जागा देण्याच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आडोशाला असलेल्या अपुऱ्या जागेत जिल्हा ग्राहक मंचाचे कामकाज सुरू आहे, याकडे अॅड. उदय वारुंजीकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच मंचाला पाच हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी केली.  या युक्तिवादाची खंडपीठाने गंभीर दखल घेतली आणि  जागा उपलब्ध करून देण्यास हयगय का केली, याबाबत सरकारकडे स्पष्टीकरण मागितले.

पक्षकार, वकिलांना उभे राहायला जागा नाही!

ग्राहकांच्या तक्रारींच्या फाईल्स मिळेल त्या मोकळ्या जागी ठेवल्या जातात. याच परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देणाऱया नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे ग्राहक मंचामध्ये येणाऱया पक्षकार व वकिलांना नीट उभे राहायला जागा नसते, असे याचिकेत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;