Ratnagiri News – गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्थी करणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती

Ratnagiri News – गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्थी करणार, मुख्याधिकाऱ्यांची माहिती

रत्नागिरी शहरामध्ये अतिवृष्टीमुळे विविध भागातील रस्त्यांना फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सद्यस्थितीत दररोज नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून डबर कच, पावसाळी डांबर, खडी वापरुन खड्डे बुजविण्याचे काम सातत्याने सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सदरचे खड्डे हे वारंवार निर्माण होत आहेत. गणेशोत्सव व इतर सणांचा विचार करता निघणाऱ्या मिरवणूकांच्या मार्गावरील उघडी गटारे बंदिस्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाहणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे गणेश मूर्तींच्या विसर्जनाच्या मार्गावर रस्त्याची धूप झाली आहे. त्यामुळे याठिकाणी भराव करणे व इतर आवश्यक ती कामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. मांडवी येथे गणपती विसर्जनासाठी आवश्यक असणारा रॅम्प दुरुस्ती व मांडवी ते नाईक फॅक्टरी दरम्यान समुद्र किनारपट्टीच्या रस्त्याची एकमार्गिकेवर वाहतूकीच्या दृष्टीने खडीकरणाचे काम गणेशोत्सव सणापूर्वी पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

गणेशोत्सव सणापूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेकडून शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण जसे कमी होईल त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे पावसाळी डांबर, खडी वगैरे साहित्य आदींचा वापर करुन गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;