Arbaaz Khan: दोन लग्न, अरबो रुपयांचा मालक, अरबाज खानबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी

Arbaaz Khan: दोन लग्न, अरबो रुपयांचा मालक, अरबाज खानबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी

Arbaaz Khan Birthday: अभिनेता अरबाज खान आज स्वतःचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अरबाज खान याचा जन्म 4 ऑगस्ट 1967 मध्ये पुणे याठिकाणी झाला. अरबाज याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला, पण अभिनेता फेल ठरला. अरबाज खान याला भाऊ सलमान खान याच्याप्रमाणे कधीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली नाही. सांगायचं झालं तर, अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. आज अरबाज याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ त्याच्याबद्दल काही खास गोष्टी…

अरबाज खानचं पूर्ण नाव अरबाज सलीम अब्दुल रशीद खान आहे. बॉलिवूडशिवाय अरबाजने साऊथ सिनेमांमध्येही काम केले आहे. 1996 मध्ये अरबाजने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दरार’ सिनेमातून अरबाज चाहत्यांच्या भेटीस आला. अभिनय क्षेत्रात यश मिळत नसल्यामुळे अरबाज याने स्वतःचा मोर्चा निर्मिती क्षेत्राकडे वळवळा… ‘दबंग’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अरबाज याच्यावर होती.

अभिनेत्री मलायका सोबत पहिलं लग्न

अरबाज खान याने दोनदा लग्न केलं आहे. अरबाज आणि मलायका यांची पहिली भेट 1993 मध्ये झाली. पहिल्या भेटीनंतर 1998 मध्ये अरबाजने पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत केलं. लग्नानंतर अरबाज – मलायका यांनी पहिला मुलगा अरहान याचं जगात स्वागत केलं.

अरबाज – मलायका यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण दोघांचं लग्न शेवटपर्यंत टिकलं नाही. लग्नाच्या 19 वर्षानंतर अरबाज – मलायका यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये अरबाज – मलायका यांनी घटस्फोटाची घोषणा केली.

अरबाज खानचं दुसरं लग्न

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

 

अरबाज खानने दुसरं लग्न वयाच्या 56 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत केलं. शूरा आणि अरबाज यांच्या लग्नात बॉलिवूडच्या काही सिलेब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं होतं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता देखील अरबाज – शूरा यांना अनेक ठिकाणी स्पॉट केलं जातं.

अरबाज खान याची संपत्ती…

अरबाजला अभिनविश्वात स्वत:ची ओळख निर्माण करता आली नसली तरी, त्याने नेट वर्थच्या बाबतीत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना मागे सोडलं आहे. रिपोर्टनुसार, अरबाजची एकूण संपत्ती 5000 कोटी रुपये आहे. सिनेमांशिवाय ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई करतो. सध्या सर्वत्र अरबाज खान याची चर्चा रंगली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;