पुण्यात आणि नाशकात मुसळधार पाऊस, पुण्यात लष्कर मदतीला तैनात

पुण्यात आणि नाशकात मुसळधार पाऊस, पुण्यात लष्कर मदतीला तैनात

पुण्यात आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. पाऊस जर असाच सुरू राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे.

पावसाची संततधार असल्यामुळे खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातल्या एकता नगरमध्ये लष्कराच 105 जवान तैनात ठेवण्यात आले आहे. खडकवासला धरणात संध्याकाळी पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल असेही सांगण्यात येत आहे. सिंहगड मार्गावर पाणी भरल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती.

दुसरीकडे नाशिकमध्येही पावसाचा कहर सुरूच आहे. गंगापूर धरण 75 टक्के भरले असून या धरणातून विसर्गही सुरू आहे. नाशिकच्या गोदाघाटात पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इगतपुरी धरणाच्या साठ्यातही वाढ झाली असून धरण 85 टक्के भरले आहे. नाशिकमध्ये सोमश्वर धबधबा ओसंडून वाहत असून पर्यटकांनी गर्दी केली आहे. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी इथे पोलिस दाखल झाले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;