आले तुफान किती, जिद्द ना सोडली.. अंतिम फेरीत हे खास पदार्थ अरुंधतीला मिळवून देणार विजेतेपद
आईने मनात आणलं तर ती काय काय करु शकते याचं आदर्श उदाहरण म्हणजे 'आई कुठे काय करते' ही मालिका. अरुंधतीचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने अगदी जवळून अनुभवला आहे.
अनेक संकटं आली तरी अरुंधती कधीही डगमगली नाही. प्रत्येक संकटाचा तिने जिद्दीने सामना केला. अरुंधतीच्या आयुष्यातला असाच एक महत्त्वाचा टप्पा आई कुठे काय करते मालिकेत सध्या सुरु आहे.
देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे. समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती. त्यामुळेच तिने महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेत मिहीर शर्मासोबत सहभाग घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List