हे एक प्रकारचं व्यसनच…; नात्यातील फसवणूक अन् सेक्सबद्दल स्पष्टच बोलला अर्जुन रामपाल

हे एक प्रकारचं व्यसनच…; नात्यातील फसवणूक अन् सेक्सबद्दल स्पष्टच बोलला अर्जुन रामपाल

‘रॉक ऑन’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता अर्जुन रामपाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. पार्टनरची फसवणूक करण्याच्या विषयावर तो बोलत होता आणि त्याने हे एक प्रकारचं ‘व्यसन’ असल्याचं म्हटलंय. या मुलाखतीत अर्जुनला कॅज्युअल सेक्स आणि ओपन रिलेशनशिप यांविषयी विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना अर्जुन म्हणाला, “जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये असते, तेव्हा दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेची देवाणघेवाण होते. याची जाणीव जरी त्यांना होत नसली तरी दोघांमध्ये एक कनेक्शन निर्माण होतं. त्यामुळे माझ्या मते एकाच पार्टनरसोबत राहणं खूप महत्त्वाचं असतं.”

रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन पुढे म्हणाला, “मला सेक्स खूप आवडतं (हसतो). माझ्या मते सेक्स हा आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. पण अर्थातच एकाच पार्टनरसोबत राहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा बेड त्या पार्टनरसोबत शेअर करता, जेव्हा तुमचं शरीर एकत्र येतं, तेव्हा तुम्हाला कळत नसलं तरी दोघांमध्ये खूप मोठ्या ऊर्जेची देवाणघेवाण होते. समोरच्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्या शरीरात येते आणि ते कुठेतरी तुमच्या डीएनएमध्येही जातं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Rampal (@rampal72)

हल्लीच्या काळात एकापेक्षा अधिक पार्टनर ठेवण्याची उदाहरणं बरीच पहायला मिळत असल्याचं रणवीर अर्जुनला सांगतो. नातेसंबंधात फसवणूक होणं हे खूपच सर्वसामान्य झाल्याचंही तो म्हणतो. त्यावर प्रतिक्रिया देताना अर्जुन त्याचं मत मांडतो. “हे एक प्रकारचं व्यसन आहे. ही सवय लोकांनीच त्यांच्यासाठी तयार केली आहे. असेही अनेक लोक आहेत, जे म्हणतात की ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप खुश आहेत. तरीसुद्धा त्यांना दुसरी महिला हवी असते. त्याला ते ‘फ्लिंग’ असं नाव देतात. ते काही महत्त्वाचं नाही, असं ते म्हणतात. पण असं नाहीये. हे खरंतर एक व्यसन आहे आणि हे व्यसन तुम्हाला खूप मागे खेचत नेतंय”, असं तो म्हणाला.

अर्जुन रामपालने लग्नाच्या 21 वर्षांनंतर पत्नी मेहर जेसियाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर 2019 पासून तो मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांना आरिक आणि आरव ही दोन मुलंसुद्धा आहेत. मात्र अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी अद्याप लग्न केलं नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;