ऑनलाईन ऑर्डर केला 55 हजार रुपयांचा मोबाईल, डिलिव्हरीत मिळाला चहाचे कप

ऑनलाईन ऑर्डर केला 55 हजार रुपयांचा मोबाईल, डिलिव्हरीत मिळाला चहाचे कप

मुंबईत एका व्यक्तीने ई कॉमर्स वेबसाईटवरून 55 हजार रुपयांचा मोबाईल ऑर्डर केला. पण त्यांना डिलिव्हरीमध्ये चहाचे कप मिळाले आहेत. ग्राहकाने या विरुद्ध ई कॉमर्स कंपनीकडे तक्रार केली पण कंपनीने दाद दिली नसल्याचे त्यांनी म्हटले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माहिममध्ये राहणारे अमर चव्हाण हे बेस्टमध्ये इंजिनीअर म्हणून काम करतात. अ‍ॅमेझॉनवरून त्यांनी 54 हजार 999 रुपयांचा Techno Fantom V Fold मोबाईल ऑर्डर केला. या मोबाईलचे पार्सल डिलिव्हरी बॉय घेऊन आला. चव्हाण यांनी अनबॉक्सिंग करताना याचा व्हिडीओही काढला. पण चव्हाण यांनी मोबाईलचा बॉक्स उघडला तेव्हा यात मोबाईल नव्हता. तर याच चहाच्या कपाचा सेट होता.

चव्हाण यांनी आधी अ‍ॅमेझॉनमध्ये तक्रार केली, तेव्हा कंपनीने यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पण कंपनीने काहीच कारवाई केली नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले. शेवटी चव्हाण यांनी पोलिसांत धाव घेतली. मोबाईलची सगंळी बिलं त्यांनी पोलिसांना दाखवली इतकेच नाही तर ज्या डिलिव्हरी बॉयने हा फोन डिलिव्हर केला त्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिले. पोलिसांनी चव्हाण यांची तक्रार दाखल केली असून पुढे तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;