स्वागत नव्या पुस्तकांचे
लहान मुलांच्या विश्वातील कथा, कल्पना यांनी सजलेल्या या कविता. बालसाहित्यातील सहजता या कवितांमधून नक्कीच उमजते. हिरव्यागार गवतांमधून अनवाणी फिरताना जाणवणारी कोवळीक या कविता वाचताना जाणवते. हे कवीला उमजलेले खरे विश्व आहे, हे या कविता वाचताना जाणवते.
दोस्त ऋतू
कवी : विश्वास वसेकर
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
पृष्ठे : 40 मूल्य : 120 रुपये
आजचे ज्येष्ठ हे भूतकाळातील तरुण होते आणि आजचे तरुण हे भविष्यात ज्येष्ठ असणार आहेत. हे चक्र अविरत फिरणारे आहे. ज्येष्ठांच्या भूमिकेत शिरल्यानंतर आलेली परिपक्वता सार्थ करणारा असा ज्येष्ठ नागरिक संघ. त्यांच्या कामाची पावती देणारे असे हे पुस्तक आहे.
रुपेरी ऊर्जा
प्रकाशक : निरामय ज्येष्ठ नागरिक संघ, तारापूर
पृष्ठे : 184
आयुष्यात जशी फुलं वाट्याला येतात तशाच जखमाही येतात. काही जखमा आयुष्यभराचे व्रण देऊन जातात तर काही तशाच भळभळत राहतात. असा हा प्रवास निरंतर सुरूच राहतो. या प्रवासातील शब्दबद्ध केलेल्या या जखमा म्हणजे एक अनुभवच. सहनशीलतेची भाषा जपणारे हे अनुभव वाचावे असेच.
भेगाळलेल्या जखमा
लेखक : उत्तम कांबळे
प्रकाशक : सुरेश एजन्सी
पृष्ठे : 112 मूल्य : 190 रुपये
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List