स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्ग; विविध केंद्रीय आस्थापना, बँकांमध्ये नोकरभरती
भारतीय रिझर्व्ह बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आयबीपीएस, कंजाब नॅशनल बँकेत विविध पदांकरिता होणाऱया परीक्षेची पूर्वतयारीकरिता स्पर्धात्मक लेखी परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार यशस्वी व्हावेत याकरिता स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे शिवसेना भवन, दादर येथे प्रशिक्षण वर्गाचे ऑनलाईन व ऑफलाईन आयोजन केले आहे.
शिवसेना नेते, खासदार आणि स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई, कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे आणि महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार नोकरभरती प्रशिक्षण वर्ग लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांनी शरद एक्के 9892699215, श्रीराम विश्वासराव 9869588469, विलास जाधव 9619118999 आणि सुधाकर नर 8969442951 यांच्याशी (रविवार आणि सुट्टीचा दिवस वगळून) सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत संपर्प साधावा, असे संघटन सचिव-प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List