मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 2 सप्टेंबरला

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 2 सप्टेंबरला

मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. ही निवडणूक आता 22 सप्टेंबरला होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर उर्वरित पाच जागा या एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत.

मतदार यादीच्या घोळात अडकलेली ही निवडणूक आधी 21 एप्रिलला होणार होती. मात्र मतदार नोंदणीच्या यादीवर आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे.

6 ऑगस्टपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज  दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत 12 ऑगस्टपर्यंत तर 26 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

22 सप्टेंबरला सकाळी नऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर 25 सप्टेंबरला मतमोजणीला सुरुवात होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;