ना बच्चन, ना खान, ‘या’ कुटुंबाची सून झाली असती ऐश्वर्या राय, मोठा खुलासा, घटस्फोटाच्या चर्चांमध्येच…

ना बच्चन, ना खान, ‘या’ कुटुंबाची सून झाली असती ऐश्वर्या राय, मोठा खुलासा, घटस्फोटाच्या चर्चांमध्येच…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायने बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका केलाय. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मोठ्या संपत्तीची मालकीन ऐश्वर्या राय आहे. फक्त हेच नाही तर पती अभिषेक बच्चन याच्यापेक्षा जास्त संपत्ती ऐश्वर्या रायकडे आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू असल्याची चर्चा आहे. यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा खरोखरच घटस्फोट होणार का? हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. श्वेता बच्चन हिच्यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होत असल्याचे सांगितले जातंय. काही दिवसांपूर्वीच प्रतिक्षा बंगला अमिताभ बच्चन यांनी श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आणि तेंव्हापासूनच वाद सुरू झाल्याची चर्चा आहे.

मुळात म्हणजे ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्यांना डेट केले. सलमान खान याला सर्वात अगोदर डेट करताना ऐश्वर्या राय दिसली. मात्र, त्यानंतर त्यांचे एका वाईट वळणावर ब्रेकअप झाले. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली.

सलमान खान याच्यासोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय ही विवेक ओबेरॉय याला डेट करत होती. क्यों! हो गया ना या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आणि त्यानंतरच त्यांच्यामध्ये जवळीकता वाढली. मात्र,  विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांची जवळीकता सलमान खान याला अजिबातच आवडली नाही.

एका मुलाखतीमध्ये थेट विवेक ओबेरॉय याने म्हटले होते की, सलमान खान याच्यासोबत असलेल्या वादामुळेच बॉलिवूडमध्ये आपल्याला काम मिळत नाहीये. ऐश्वर्या राय हिला डेट करणे विवेक ओबेरॉयला अत्यंत महागात पडल्याचे बघायला मिळाले. जर सर्वकाही ठीक राहिले असते तर ओबेरॉय कुटुबाची सून ऐश्वर्या राय ही झाली असती. पुढील काही दिवसांमध्येच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दल मोठे अपडेट पुढे येऊ शकते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;