Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वाचा सविस्तर…

Mega Block News – मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक, वाचा सविस्तर…

मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या वतीने उद्या (4 जुलै) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यानुसार माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर पुन्हा मुलुंड डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक

टिटवाळा लोकल ही ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.22 वाजता सुटेल.

अप धीम्या मार्गावर

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही आसनगाव लोकल आहे जी ठाणे येथून सकाळी 10.27 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण लोकल ठाणे येथून दुपारी 04.03 वाजता सुटेल. वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वांद्रे/गोरेगाव सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही).

ब्लॉक कालावधीत वडाळा रोड आणि मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग बंद राहील

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.54 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 9.40 ते दुपारी 3.28 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

डाउन हार्बर मार्गावर ब्लॉक

  • ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.52 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 11.12 वाजता पोहोचेल.
    ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल वडाळा रोड येथून सकाळी 10.14 वाजता सुटेल आणि 11.16 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
  • ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सायंकाळी 4.00 वाजता सुटेल आणि सायंकाळी 5.21 वाजता पनवेल येथे पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर ब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 9.28 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सकाळी 10.48 वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल बेलापूर येथून दुपारी 3.47 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 4.51 वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.45 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सायंकाळी 5.04 वाजता पोहोचेल.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
  • तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर लाईन आणि मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;