माधुरी दीक्षितच्या पतीने दिल्या मायक्रोवेव्हबद्दल खास टीप्स, सुरक्षितपणे कसे तयार करायचे जेवण आणि…

माधुरी दीक्षितच्या पतीने दिल्या मायक्रोवेव्हबद्दल खास टीप्स, सुरक्षितपणे कसे तयार करायचे जेवण आणि…

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही कायमच चर्चेत असते. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मुळात म्हणजे माधुरी दीक्षितने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अनेक हीट चित्रपटे माधुरी दीक्षितने बॉलिवूडला दिली आहेत. गेल्या काही वर्षांपासून माधुरी दीक्षित ही विदेशात राहाते. मात्र, आता परत आपल्या पतीसोबत माधुरी दीक्षित ही भारतामध्ये परतलीये. विशेष म्हणजे अनेक शोमध्ये सहभागी होतानाही माधुरी दीक्षित दिसत आहे. माधुरी दीक्षित हिच्या पतीचे नाव श्रीराम नेने असून ते एक डॉक्टर आहेत. श्रीराम नेने हे त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या टीप्स शेअर करताना दिसतात.

आता माधुरी दीक्षितच्या पतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये श्रीराम नेने हे काही महत्वाच्या गोष्टी शेअर करताना देखील दिसत आहेत. श्रीराम नेने यांनी मायक्रोवेव्हमध्ये कशा सुरक्षित पद्धतीने जेवण तयार करायला हवे किंवा गरम करायला हवे हे थेट सांगितले आहे. 

श्रीराम नेने यांच्या मते कधीच मायक्रोवेव्हमध्ये ब्रेड गरम करण्यासाठी ठेऊ नये, असे केल्याने ते रबरसारखे होते. मायक्रोवेव्हसाठी कधीच मेटलची भांडी वापरू नये. मेटलच्या भांड्यांमुळे मायक्रोवेव्हमध्ये स्पार्क होते. हेच नाही तर यामुळे मोठी दुर्घटना देखील होऊ शकत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

हेच नाही तर जेवण गरम करण्यासाठी कधीच प्लास्टिकच्या भाड्याचा वापर करू नये. जर तुम्ही प्लास्टिकच्या भाड्याचा जेवण गरम करण्यासाठी वापर मायक्रोवेव्हमध्ये करत असाल तर आजच सावधान व्हा. कारण प्लास्टिकच्या भांड्यामधील केमिकल थेट अन्नामध्ये उतरते. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. 

मायक्रोवेव्हमध्ये काचेच्या भांड्यामध्ये अन्न गरम करणे अधिक चांगले असल्याचेही श्रीराम नेने यांनी म्हटले आहे. आता श्रीराम नेने यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. माधुरी दीक्षित हिचा काही दिवसांपूर्वीच वाढदिवस झाला. विशेष म्हणजे एका शोमध्ये माधुरी दीक्षित हिला खास सरप्राईज देण्यात आले. यावेळी श्रीराम नेने हे देखील शोमध्ये पोहोचले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;