Ratnagiri News – पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रत्नागिरीकर त्रस्त

Ratnagiri News – पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रत्नागिरीकर त्रस्त

कोकणाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रत्नागिरीकर सध्या त्रस्त आहेत. मारूती मंदिरपासून जयस्तंभपर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. पावसामुळे मारूती मंदिरच्या पुढील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रखडले.

पाऊस कोसळताच खडी आणि डांबर वाहून गेल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावर पसरलेली खडी रत्नागिरी नगर परिषदेकडून गोळा करण्यात आली आहे. रस्त्यावरील खडी काढल्यामुळे वाहनचालकांनी नि:श्वास सोडला आहे.

रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झालेली असताना शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडत आहे.

रत्नागिरी शहरात मारूती आळी परिसरात रस्ता खचल्यासारखे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांची रांगच लागल्याने ते चुकवणे म्हणजे वाहनचालकांसाठी एक टास्क आहे. वाहनचालक अक्षरश: कसरत करत वाहन चालवतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;