Hit & Run : भरधाव कारची स्कूटीला धडक; आईचा जागीच मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

Hit & Run : भरधाव कारची स्कूटीला धडक; आईचा जागीच मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

मुंबईतील ‘हिट अँड रन’ची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव कारने स्कूटीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्कूटीला उडवल्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अन्य वाहनांना धडक दिली. अपघातानंतर स्थानिकांनी अल्पवयीन चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन चालकाच्या वडिलांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन चालक हा बारावीचा विद्यार्थी आहे. कॉलेजला दांडी मारून तो अन्य मित्रमैत्रिणींसह चालत्या कारमध्ये स्टंटबाजी करत होता. बहिणीला कॉलेजला सोडण्यासाठी अल्पवयीन मुलाला कार देण्यात आल्याचे त्याच्या वडिलांनी पोलीस चौकशीत सांगितले. मात्र कार चालवण्यासाठी ड्रायव्हिंगचे पुरेसे ज्ञान मुलाकडे नव्हते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी 100 च्या वेगाने कार चालवत होता. त्याने स्कूटीला धडक दिल्यानंतर स्कूटीवरील महिला 20 ते 30 फूट दूर फेकली गेली. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. तर तिची 12 वर्षाची मुलगा गंभीर जखमी झाली आहे. यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन वाहनांना धडक दिली.

कारमध्ये दोन मुली आणि दोन मुलगे होते. घटनेनंतर कारमधील दुसरा मुलगा आणि दोन मुलींनी घटनास्थळावरुन पलायन केले. चालकाला स्थानिकांनी पोलिसांच्या हवाली केले. पीडित महिला मुलीला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेली होती. तिथून परतत असतानाच हा अपघात घडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;