अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या खासगी आयुष्यात मोठी खळबळ, नक्की झालं तरी काय?

अमिताभ बच्चन यांच्या नातीच्या खासगी आयुष्यात मोठी खळबळ, नक्की झालं तरी काय?

Amitabh Bachchan granddaughter Navya Naveli Nanda: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण आता बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. एक काळ असा होता, जेव्हा नव्या हिच्या नावाची चर्चा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबत रंगली होती. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.

सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांची सुरुवात त्यांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर सुरु झाली. ऋषिकेश याठिकाणी सिद्धांत आणि नव्या यांनी एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतला होता. दोघांना एका दिवाळी पार्टीमध्ये देखील कारमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण आता सिद्धांत आणि नव्या यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

 

सांगायचं झालं तर, सिद्धांत, नव्या नवेलीची आई श्वेता बच्चन हिच्या वाढदिवसासाठी देखील आला होता. दोघांना एकदा गोवा विमानतळावर देखील एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण दोघांनी कधीच्या त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. आता दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, सिद्धांत आणि नव्या याचं मार्ग आता वेगळे झाले आहे. पण दोघे आजही चांगले मित्र असल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांनी सिद्धांत आणि नव्या यांचं ब्रेकअप झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कारण दोघे कायम एकमेकांच्या पोस्टवर लाईक, कमेंट करायचे. शिवाय रेड हार्ट देखील कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करायचे. पण आता दोघे एकमेकांची देखील लाईक करत नाही… त्यामुळे सिद्धांत आणि नव्या यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला…

सिद्धांत चतुर्वेदी याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘खो गए हम कहां ‘ सिनेमात दिसला होता. सिनेमात अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदर्श गौरव यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण आता सिद्धांत याच्याकडे दुसरा कोणताच प्रोजेक्ट नसल्याची माहिती समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;