एटीएसची भिवंडीत कारवाई, अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त

एटीएसची भिवंडीत कारवाई, अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त

बेकायदेशीर सिम बॉक्सच्या सहाय्याने भिवंडी परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेला टेलिफोन ऐक्सचेंजचा गोरखधंदा दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने उद्ध्वस्त केला. अशा प्रकारे बोगस टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांपासून हे टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याने त्यात केंद्र सरकारचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भिवंडी परिसरातील नालासोपारा, गौरीपाडा आणि रोशनबाग येथे बेकायदेशीर सिम बॉक्सच्या सहाय्याने अनधिकृतपणे टेलिफोन ऐक्सचेंज सुरू असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दिनस्टार कंपनीचे नऊ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे 146 सीम कार्ड, विविध कंपन्यांचे आठ वायफाय राऊटर, सिम बॉक्स चालविण्यासाठी वापरण्यात येणारे 198 अ‍ॅण्टीना, इन्व्हर्टर असा एक लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान या कारवाईत जाफर पटेल (40) या व्यक्तीला पकडण्यात आले. चौकशीत त्याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने हे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचे सांगितले. शिवाय गेल्या दीड वर्षापासून हा गोरखधंदा सुरू होता. त्यामुळे दूरसंचार विभाग, हिंदुस्थान सरकार आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तब्बल तीन कोटी रुपयांचे या बोगस टेलिफोन एक्सचेंजमुळे केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. एटीएसने जाफर पटेल याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;