उद्धव ठाकरे यांची उल्हास बापट, असीम सरोदे यांच्याशी चर्चा

उद्धव ठाकरे यांची उल्हास बापट, असीम सरोदे यांच्याशी चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट आणि प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रश्मी ठाकरे या उपस्थित होत्या.

उद्धव ठाकरे हे पुण्यात उद्या होणाऱ्या शिवसंकल्प अभियान ‘चला जिंकूया…’ या शिवसेना गटप्रमुखांच्या शिबिरासाठी आज पुण्यात दाखल झाले. त्यांचे पुण्याच्या वेशीवर रावेत येथे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ घटनातज्ञ अ‍ॅड. उल्हास बापट यांची प्रभात रोड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बापट कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. तर उद्धव ठाकरे यांनी बापट यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्यामध्ये सुमारे एक तासभर चर्चा आणि कौटुंबिक गप्पा झाल्या.

विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी सरोदे यांचे सहकारी वकीलदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि सरोदे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.  सरोदे यांनी त्यांना अनेक बाबींवर माहिती दिली. शिवसेना सचिव विनायक राऊत यावेळी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;