दहा दिवस दप्तराविना; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीसाठी उपक्रम

दहा दिवस दप्तराविना; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीसाठी उपक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तराविना शिक्षण होणार आहे. या दहा दिवसांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्ये, सर्वेक्षण, भेटी, सहली असे उपक्रम राबवले जाणार आहेत. शाळांनी आपल्या सोयीनुसार वर्षभरात केव्हाही हा उपक्रम राबवायचा आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आनंददायी करण्यासह त्यांना व्यावहारिक कौशल्ये, हस्तकौशल्ये, अनुभवाधिष्ठत शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने दहा दिवस दप्तराविना आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही शिफारस केली आहे. या शिफारसीनुसार नियमित अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे. भोपाळस्थित पीएसएस पेंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेने काही राज्यांतील शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. त्यातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक काwशल्ये शिकण्यात रस असण्यासह दप्तराविना दिवसांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. विद्यार्थी सरासरी सहा तास आणि वर्षभरातील सुमारे एक हजार तासांपेक्षा जास्त वेळ शाळेत असतात. किमान दहा दिवस किंवा साठ तास दप्तराविना दहा दिवस उपक्रमासाठी द्यायचे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;