यूजीसी नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) घेण्यात येणाऱ्या यूजीसी नेट परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. एनटीएतर्फे यूजीसी नेट जून 2024 परीक्षा केव्हा घेतली जाणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह यंदा प्रथमच पीएचडी प्रवेशासाठीसुद्धा या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यूजीसी नेट जून 2024 ही परीक्षा कोणत्या विषयांसाठी असेल याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परीक्षेपूर्वी दहा दिवसआधी परीक्षा पेंद्राचे नाव व शहराचे नाव विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी यूजीसीच्या www.nta.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List