बीडमध्ये स्वाईन फ्ल्युचा बळी; आरोग्य विभागात खळबळ

बीडमध्ये स्वाईन फ्ल्युचा बळी; आरोग्य विभागात खळबळ

बीड जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्ल्यूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रावसाहेब रामचंद्र चाटे (65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अंबाजोगाई तालुक्यातील साकुडमध्ये हा रुग्ण सापडला असून या गावाचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाच वर्षांत स्वाईन फ्ल्यूचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे.

पंढरपूरवरून वारी करून परत आल्यानंतर आजारी पडल्याने अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा मृत्यू उपचार सुरू असतानाच 17 जुलै रोजी झाला होता. परंतु, लक्षणे पाहता येथील डॉक्टरांनी त्यांचे नमुने घेत छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा 1 ऑगस्ट रोजी बीडच्या आरोग्य विभागाला रिपोर्ट मिळाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. अंबाजोगाई तालुक्यातील साकुड गावात आरोग्य कर्मचार्‍यांकडून सर्वेक्षण करत कोणाला लक्षणे आहेत का? याची माहिती घेतली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;