संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आळंदीत साजरा; हरिनामाचा गजर

संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा आळंदीत साजरा; हरिनामाचा गजर

श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विना मंडपात श्री संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण, प्रतिमा पूजन झाले. गणेश महाराज भगत यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात रुजू झाली.

गणेश महाराजांनी श्री संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. श्री संत नामदेव महाराज यांच्या हातून नैवेद्य हतिचा मुर्तीजेवी आशे अनेक नामदेवरायांच्या जीवनामधील प्रसंग सांगितले. नामदेव महाराजांचे अभंग दोन चरणापासून ते शंभर चरणांपर्यंत असल्याचे त्यांनी आपल्या कीर्तनामधून सांगून सर्व श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. सर्व उपस्थित भाविक भक्त भजनाच्या आनंदामध्ये डोलू लागले. सर्व संतांच्या पुण्यतिथी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी व वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 11 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व संतांच्या मंदिरामध्ये साजरा होत असतात. याही पुढे संपूर्ण वाडी वस्ती, गाव या ठिकाणी सुद्धा सर्व भाविकांनी नामदेवराया अथवा सर्व संतांच्या पुण्यतिथी या मोठ्या भक्ती भावाने साजरे कराव्यात, असे महाराजांनी आपल्या कीर्तनातून सर्वांना मार्गदर्शन केले.

ज्ञानेश्वर माऊली चे भजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरामध्ये पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर कीर्तनकारांचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या भक्त निवास मध्ये सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेतील सर्व गुरुजन मंडळी सर्व संतांच्या समाधी सोहळा व पुण्यतिथी ला उपस्थित राहून सेवा देत आहेत. कार्यक्रमास श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, विश्वनाथ चोरगे, कृष्णा कोलते, पवन लिंगायत, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, मळाई देवी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने नामदेवरायांच्या सोहळ्याला उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;